Home अहेरी लाहेरी येथील गुरांच्या गोट्याचे पैशे मिळवून देण्याकरिता लाभार्थ्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार...

लाहेरी येथील गुरांच्या गोट्याचे पैशे मिळवून देण्याकरिता लाभार्थ्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी

59
0

भामरागड : नरेगा अंतर्गत गुरांचे गोट्याचे पैसे मागील चार वर्षे पासुन ग्रामपंचायत लाहेरी येथील लाभार्थीना मिळत असल्याने आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

“सदर निवेदनात अशे म्हटले आहे की..!

भामरागड पंचायत समिती अंतर्गत येत असलेले ग्रामपंचायत लाहेरी येथील लाभार्थींना नरेगा अंतर्गत मागील चार वर्ष पासून गुरांचे गोठयाचे पैसे देण्यास टाळटाळ करत आहे.मागील चार वर्ष पासून पंचायत समिती भामरागड ला येण्या जन्य करीता अंदाजे 20.000 हजार रुपये खर्च झाले तरी पण आमच्या कडे नरेगा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार या योजनेचे अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाही.तरी कृपया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आम्ही तुम्हास विनंती करतो की आमच्या हक्काचे पैशे मिळवून देण्यास मदत करावे अशे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here