Home सामाजिक आलापल्ली नगरीत विविध ठिकाणी कंकडालवार दामपात्यांनी दिली शारदा व दुर्गा मंडळाला भेट

आलापल्ली नगरीत विविध ठिकाणी कंकडालवार दामपात्यांनी दिली शारदा व दुर्गा मंडळाला भेट

24
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही आलापल्ली नगरीत विविध ठिकाणी शारदा व दुर्गा उत्सव उत्साहात पार पडत आहे.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी युवा शारदा महिला मंडळ टेकडी कॉलनीसह आलापल्ली नगरीत विविध मंडळ ठिकाणी महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले आहे.

आलापल्ली हद्दीतील अनेक ठिकाणी कंकडालवार दाम्पत्यांनी उपस्थिती दर्शवून शारदा मातेची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले.तसेच अनेक ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम असून उपस्थित परिसरातील नागरिक व भाविकांना कंकडालवार दामपात्यांनी महाप्रसाद वितरण करण्यात आली आहे.तसेच प्रत्येक मंडळ ठिकाणी वर्गणीही देण्यात आली.

त्यावेळी कंकडालवार दामपात्यांनी शारदा मातेची चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून मनोभावे प्रार्थना केली.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here