Home सिरोंचा बिहार राज्यातून सायकल चलाओ पर्यावरण बचाओ संकल्पनेतून ऑल इंडिया प्रवास करणाऱ्या युवक...

बिहार राज्यातून सायकल चलाओ पर्यावरण बचाओ संकल्पनेतून ऑल इंडिया प्रवास करणाऱ्या युवक साकेत सिरोंचा तालुक्यात भेट

57
0

सिरोंचा : भारतातील बिहार राज्यातून दरभंग येथून सायकल चलाओ : पर्यावरण बचाओ संकल्पना घेऊन दरभंग येथील युवक साकेत यांनी ऑल इंडिया प्रवास सुरू करून प्रत्येक राज्यात पर्यावरण बचाव करण्यासाठी प्रयत्न करून साकेत युवकांनी सायकल चालवत प्रवास सुरू केली आहे.त्या युवकांनी बिहार राज्यातून ऑल इंडिया प्रवास करत आज पर्यंत 9 महिना पूर्ण झाली आहे.नऊ महिने पूर्ण करून महाराष्ट्र राज्यातील सिरोंचा तालुका पोहचलेल्या युवकाला सिरोंचा शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर भाऊ मूलकला यांचे कडून शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले आहे.आणि पुढील प्रवासाचे शुभेच्छा देखील देण्यात आले आहे.त्यावेळी शरद पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांनी बोलत बिहार येथुल युवक साकेत यांनी आपल्या कुटुंबाला सोडून भारत प्रवास सुरू केले.युवक साकेत यांनी करत असलेल्या संकल्पना सायकल चलाओ : पर्यावरण बचाओ म्हणजे हा आपल्या होणाऱ्या पोलुशन बंद करण्यासाठी आणि आपल्या पर्यावरण बचाव करण्यासाठी यांनी करत असलेल्या संकल्पना अतिशय सुंदर आणि गर्वकारक संकल्पना आहे.आपण अशा लोकांच्या संकल्पनेतून आपल्या जीवनात आपल्या कडून होत असलेल्या पोलुशन नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे आहवन देखील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष – सागर भाऊ यांनी केली आहे.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here