सिरोंचा – अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री श्री.मा.डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 2/11/25 रोजी सिरोंचा तालुक्यातील विविध गावामध्ये भेट देऊन कार्यकर्त्यांशी सवांद साधले
सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सिरोंचा तालुक्यातील बामणी, झिंगानूर, सिरकोंडा तसेच इतर गावामध्ये भेट देऊन 4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित होणाऱ्या आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री मा.डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या दौऱ्याबद्दल झिंगानूर परिसरातील गावामध्ये माहिती देऊन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी बाबत सविस्तर चार्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नायक बानय्या जनगाम, सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान,ग्रापं झिंगानूरचे उपसरपंच शेखर गणपूरपू, माजी सरपंच बोडका गावडे, भारत मडावी,ग्रापं वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम,रोमपल्लीचे प्रतिष्टीत नागरिक बंडू गावडे,सोशल मीडिया प्रतिनिधी रवी कार्सपल्ली, श्रीनिवास कुम्मरी, महेश दुर्गम, जगदीश कुम्मरी,अनिल कोटा, श्रीनिवास घोडाम, ग्रापं गरकापेठाचे उपसरपंच वेंकटी दसरी, समय्या मारबोईना, मोहन डोंगरे, मोंडी तलंडी, गणेश बचलकुरा, बक्कना वेमूरला, येमा मालय्यासह झिंगानूर, बामणी, कोटा माल, सिरकोंडा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home सिरोंचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले सिरोंचा तालुक्यातील (राकॉ) कार्यकर्त्यांची...





