Home अहेरी आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते चिरेपली येते व्हाॅलीबाॅल स्पर्धचे...

आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते चिरेपली येते व्हाॅलीबाॅल स्पर्धचे उद्घाघाटन

44
0

अहेरी : तालुक्यातील चिरेपल्ली येथील स्व.समीर बाजीराव गावडे – स्व.सुनील मडावी – स्व.रायसिंग लस्मा आलाम – यांच्या स्मृती प्रित्यर्थ व्हाॅलीबाॅल सामने आयोजीत करण्यात आले.सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी – अहेरी पंचायत समिती माजी सभापती भास्कर तलांडे कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक युवा समिती चिरेपल्ली कडून देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी होते.अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे आणि काँग्रेस अहेरी तालुका अध्यक्ष डॉ.निसार ( पप्पू ) हकीम होते.

यावेळी मंचावर खांदलाचे माजी सरपंच भगवान मडावी,तंटामुक्ती अध्यक्ष मुत्ताजी पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट,माजी ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत आत्राम, डॉ.नामदेव पेंदाम सर एस.बी.कॉलेज अहेरी, पाटील रघुनाथ मडावी, प्रतिष्ठीत नागरिक धर्मा पेंदाम लालू पेंदाम गणपत आलाम चंदु आलाम सचिन पंचार्यसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळातील पदाधिकारी सदस्यसह गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मडावी उपाध्यक्ष प्रदीप पेंदाम सचिव गणेश मडावी संदीप पेंदाम चंद्रकांत कुमरे सुनील मडावी आदीनी सहकार्य केले संचालन व आभार श्री. मुकुंद सोयाम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here