अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत दामरंचा अंतर्गत येत असलेल्या मौजा भंगारामपेठा व देचलीपेठा या गावात BSNL मोबाईल नेटवर्कची खुपच अडचण भासत आहे.यामुळे येथील नागरीकांना सवांद साधणे शैक्षणिक कामे,ऑनलाईन व्यवहार,तसेच अपत्कालीन संपर्क साधने मोठे अडथळा निर्माण होत असल्याने?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा नेतृत्व व मार्गदर्शनाखाली संबंधित कंपनीला गावातील मोबाईल टॉवरची तात्काळ सेवा सुरु करण्यात यावी म्हणून अहेरी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मागणी केले आहे.
यावेळी निवेदन देतांना माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रमोद कोडापे,जे.टी.मडावी,नरेश गर्गम,राजू दुर्गे,कार्तिक तोगाम,सत्यम नीलम,समय्या मुलकरी,आनंद जियाला,विष्णू मुलकरी,आनंद मुलकरी,सीताराम वेलदी,जयराम आत्राम,विनोद दुनलावर,सागर वेलदी,राजू मडावी,परदेश मडावी,अनिल मुलकारी,बापू शेगम,संतोष मडावी,मासा मडावी,कारे वेलदी,मारा वेलदी,मनोज कोडापे, राकेश आत्राम,रोशन वेलादी, मधुकर मडावी, पवन वेलादि,भास्कर कोडापे,विशाल कोडापे,विलास आलाम अविनाश गेडाम,प्रवीण कोरेत रमेश मडावी यांच्यासह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





