सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारीला म्हणजे 07 तारीखेला सिरोंचा येथे काँग्रेसची रणनीती बैठक आयोजित करण्यात आली आहे.जिल्ह्यात काँग्रेसची संघटना मजबूत करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकहाती सत्ता स्थापनेसाठी पक्षनेते कटिबद्ध आहेत.
काँग्रेसचे जेष्ठानेते व माजी मंत्री तथा आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांचा आदेशानुसार,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हणमंतू मडावी साहेबांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली हा बैठक पार पडणार आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेत असून,या बैठकीत त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी या बैठकीला सर्व इच्छुक उमेदवार, पदाधिकारी,कार्यकर्ते,आजी-माजी जि.प.व पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष श्री.सतीशभाऊ जावजी यांनी केले आहे.
📍 स्थळ : क्रीडा संकुल ग्राऊंड सिरोंचा
🕚 वेळ : दुपारी 12 वाजता
Home सिरोंचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक : काँग्रेसनेते अजय कंकडालवार व...





