सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जनतेसाठी नेहमीच तत्पर असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुन्हा एकदा आपली माणुसकीची ओळख जपली आहे.
सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथील रहिवाशी दुर्गय्या मालय्या बोगटा यांची दुःखद निधन झाले होते.घर चालवणार माणूस निधन झाल्याने त्या बोगटा कुटुंबावार दुःखाचा डोंगर कोसळला.आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने घर चालवणेही कठीण झाले तसेच पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमलाही अडचण बसत होती.
ही बाब काल काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसनेते हणमंतू मडावी साहेबांनी सिरोंचा दौऱ्यावर असतांना येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली.कंकडालवारांनी तात्काळ पुढाकार घेत बोगटा परिवाराला वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत केली.त्यांच्या या मदतीमुळे बोगटा कुटुंबातील सदस्यांचा डोळ्यात अश्रू तरळले,पण ते होते आभारांचे व दिलास्याचे अश्रू.
अजय कंकडालवार हे निवडणुकीपुरते लोकांमध्ये वावरणारे नेते नसून,प्रत्येक सामान्य कुटुंबाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे खरे जननेते म्हणून ओळखले जातात.ते तेरवी, वाढदिवस,लग्नकार्य,आजारपण, नैसर्गिक आपत्ती अशा प्रत्येक प्रसंगी परिवारातील सदस्यासारखे सहभागी होतात.या छोट्याशा पण मोलाच्या मदतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की,नेतेपद फक्त पदावरून नव्हे,तर कृतीतून सिद्ध होत असते.
यावेळी शंकर गोडम ग्रामपंचायत सदस्य,महेंद्र दुर्गम ग्रामपंचायत सदस्य,आनंद अशा सामाजिक कार्यकर्ता,शंकर कोटा,सडवली सडमेक,पूनम मेरा,शेकर नदीगोटा,नरेश गोपाला,राजशेकर,सडवाली सडमके,समय्या बेडकी,रवितेज कावरे यांच्यासह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home सिरोंचा दुःखाच्या काळात दिलासा : अजय कंकडालवार यांच्याकडून बोगटा परिवाराच्या तेरवी कार्यक्रमला आर्थिक...





