सिरोंचा : तालुक्यातील पेंटीपाका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लंबडपल्ली,मुगापूर आणि मृदूकृष्णापूर या तीन गावांचा जीवनवाहिनी असलेल्या शिवार रस्ता काही व्यक्तींनी अतिक्रमण करून बंद केले.
शिवार रस्ता बंद झाल्याने गावकऱ्यांचा त्रास अनंतपट वाढला आहे.शेतकऱ्यांना शेतीत जाणं कठीण झालंय,चारा वाहतूक थांबलीये,आणि सर्वात गंभीर म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा रस्ता मिळत नाही आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे तीन गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन तहसीलदार सिरोंचा यांच्याकडे लेखी निवेदन दिलं.मात्र प्रशासनाने अजूनही कोणतीही ठोस कारवाई केली नाही.यामुळे शुक्रवारला गावातील युवकांनी व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या दौऱ्यात भेट घेऊन अतिक्रमण हटवून रस्ता तात्काळ खुला करण्याची मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत अंतर्गम, कैलाश जिमडे, तिरुपती दुर्गम,सडवाली दुर्गम,मधुकर मानेटी, प्रवीण अजमेरा आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी काँग्रेस नेते कंकडालवार यांनी युवकांना व गावकऱ्यांना सकारात्मक आश्वासन देत संबंधित विभागाला सूचना देऊन रस्ता मोकळा करून देण्याची आश्वासन दिले.
Home मुख्य बातम्या तीन गावांचा शिवार रस्ता बंद…लंबडपल्ली येथील गावकऱ्यांच्या संताप उसळला..काँग्रेस नेते कंकडालवार यांनी...





