Home गडचिरोली आमदार डॉ.देवरावजी होळी यांचे अध्यक्षतेखाली कॉम्प्लेक्स विश्रामगृहामध्ये तिन्ही तालुक्यातील प्रमुख अधिकारी-यांची बैठक...

आमदार डॉ.देवरावजी होळी यांचे अध्यक्षतेखाली कॉम्प्लेक्स विश्रामगृहामध्ये तिन्ही तालुक्यातील प्रमुख अधिकारी-यांची बैठक संपन्न : क्रीडांगनांच्या बांधकामा संदर्भात व सद्यस्थितीबाबत घेतला आढावा

91
0

अहेरी टुडे /प्रतिनिधी गडचिरोली

चामोर्शी व धानोरा तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल तसेच गडचिरोली जिल्हा केंद्रावरील जिल्हा स्टेडियम च्या बांधकामाला गती मिळावी याकरिता अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात प्रलंबित असलेल्या बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सर्किट हाऊस विश्रामगृह गडचिरोली येथे पार पडलेल्या बैठकीच्या प्रसंगी दिले.आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये गडचिरोलीचे तहसीलदार श्री गणवीर साहेब,चामोर्शीचे तहसीलदार श्री नागटिळक साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री मुंदडा साहेब,तिन्ही तालुक्यातील संवर्ग विकास अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी,विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते

बैठकीच्या दरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी क्रीडा संकुलाच्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेतला व सदर क्रीडा संकुलांची बांधकामाचे कशी करता येईल ,यासंदर्भात अधिकाऱ्यांना काय अडचणी येतील याबाबत जाणून घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here