अहेरी : तालुक्यातील चिंचगुंडी येथील भाना मुत्ता देव्हारा यांची दुःखद निधन झाले.माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी त्या परिसरातील दौऱ्यावर असतांना येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या दुःखद निधनाची विषय कंकडालवार यांना सांगितले होते.
काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी मृत्यक देव्हारा कुटुंबांची भेट घेऊन आस्थेने सांत्वन केले.दरम्यान देव्हारा परिवाराला घर चालवण्यासाठी तसेच पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमला अडचण बसत असल्याची माहिती अजय कंकडालवार यांना सांगितले होते.त्यावेळी कंकडालवारांनी देव्हारा कुटुंबाची अडचण बघून त्यांना तेरवी कार्यक्रमला आर्थिक मदत केले.
यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.





