Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तलांडी कुटुंबांची सांत्वनपर भेट व आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तलांडी कुटुंबांची सांत्वनपर भेट व आर्थिक मदत

3
0

अहेरी : तालुक्यातील आरेंदा येथील तरुण युवक साधु तलांडी वय (२५) हा हेमलकसा येथील विद्युत कार्यकारी अभियंता कार्यालय अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कामगार पदावर कार्यरत होता.

१० जानेवारी म्हणजे शनिवारीला भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम गावाजवळील परली गावामध्ये विद्युत सहाय्यक सोबत ११ केव्ही विद्युत दुरुस्ती करिता गेले होता.त्यावेळी विद्युत दुरुस्तीचा काम करतांनाच,विद्युत शॉक लागुन साधु तलांडी यांच्या जागेवरच दुर्दैवी मृत्यु झाला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी यांनी आज आरेंदा गावात जाऊन पिढीत तलांडी कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबीयांचा सात्वन करून, आर्थिक मदत करण्यात आला.

यापुढेही कोणत्याही अडचण पडल्यास आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून तलांडी कुटुंबियांना मोठा धीर दिला.

यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद आत्राम,मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी असिफ खान पठाण,साजन गावडे,कवीश्वर चंदनकेडे,यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here