एटापल्ली : तालुक्यातील उंडेरा येथील जय संघर्ष क्रीडा मंडळ उंडेरा यांचे सौजन्याने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे.स्पर्धेला द्वितीय पारितोषिक,तृतीय पारितोषिक,चतुर्थ पारितोषिकही ठेवण्यात आली.
सदर स्पर्धेत परिसरातील तसेच इतर तालुक्यातील अनेक संघ भाग घेतले होते.यात प्रथम पारितोषिक केहकापरी भामरागड संघाला.द्वितीय पारितोषिक स्वामी समर्थ अनुदानित आश्रम शाळा उडेरा संघाला,तृतीय पारितोषिक एटापल्ली संघाला,चतुर्थ पारितोषिक उडेरा संघाला मिळाली असून माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा नेतृत्वाखाली काँग्रेसनेते प्रज्वलभाऊ नागूलवार यांचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमला अजय गावडे,दलसु दुर्वा,धर्मेंद्र होयामी,श्रावण चांदेकर,बापू दुर्वा,आशिष कांबळे,शेंडेभाऊ,इंद्रजीत शहा,प्रकाश दुर्वा,अंकित गावडे,रामजी गुमा यांच्या सह परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Home अहेरी काँग्रेसनेते प्रज्वलभाऊ नागूलवार यांचाहस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न…स्पर्धेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार...


