Home सामाजिक जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल…नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात...

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल…नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात डॉक्टरेट पदवीने सन्मानित

1
0

गडचिरोली : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यात व अहेरी विधानसभा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय विकास कामे व सामाजिक कार्याची पावती म्हणून नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात त्यांना सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.

आज सम्राट हॉटेल नवी दिल्ली येथे ग्लोबल अचिव्हर्स कौन्सिल कडून आयोजित राष्ट्रीय गौरव आयकॉन पुरस्कार सोहळ्यात कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

सेवाभावी व निःस्वार्थ समाजसेवक अजयभाऊ कंकडालवार यांना सौथर्न अमेरिकन युनिव्हरसीटी कडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना डॉक्टरेट पदवी बहाल झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरावरून अभिनंदनाच वर्षाव होतं आहे.सामाजिक विकास,दुर्गम भागातील सेवा उपक्रम आणि लोकहिताच्या विविध योजनांमधील योगदानाबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करत विकासाचा वेग वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची ही मोठी दखल मानली जात आहे.या सन्मानामुळे गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here