Home गडचिरोली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे योग शिबीराचे आयोजन :...

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे योग शिबीराचे आयोजन : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोस्टे – उपपोस्टे – पोगकें येथील अधिकारी – अंमलदार झाले सहभागी

231
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( Gadchiroli )

गडचिरोली : आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.भारतीय प्राचीन संस्कृती,परंपरा यामध्ये योग, योगासने,योगसाधना यांना अनन्य साधारण महत्व आहे तसेच प्राचीन काळापासून ऋषीमुनी,साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्व, फायदे व त्याची गरज पटवून सांगीतले आहे.आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगासनाच्या माध्यमातून आपण आपले शरीर कसे तंदरुस्त ठेवता येईल,आपल्या तन-मनावर कसे चांगले संस्कार करता येईल याकरीता आज रोजी २१/०६/२०२३ रोजी ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे सकाळी ५ ते ७ वाजतापर्यंत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले.सदर योग शिबीरामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, विशेष अभियान पथक व राज्य राखीव पोलीस दल येथील एकुण १००० च्या संख्येने अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. तसेच योग शिबीरास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोस्टे / उपपोस्टे / पोमकें येथील सर्व अधिकारी / अंमलदार सुद्धा सहभागी झाले होते. या योग शिबीरामध्ये योगाचे शारीरिक,मानसिक व आध्यात्मिक असे तीन प्रकार शिकविण्यात आले.तसेच या योग शिबीरामध्ये योगगुरु श्री. श्रीकृष्ण शेवाळे यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना योगासनाचे महत्व पटवून सांगीतले. यासोबतच योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पोलीसांना कामकाज करताना येणारे ताणतणाव योगासनाद्वारे कसे नियंत्रणात ठेवता येईल यासाठी विविध प्रकारची योगासने करुन त्यांचे महत्व पटवुन सांगीतले.सदर योग शिबीरामध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल सा.मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच नागपूर येथील योग मेडीटेशन मार्गदर्शक श्री. दिपक पटेल व मध्यभारत समर्पण आश्रम, बुट्टीबोरी नागपूर येथील योग मेडीटेशन योगगुरु श्री. श्रीकृष्ण शेवाळे हे उपस्थित होते.सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयाचे रापोनि. श्री. विठ्ठल मुत्यमवार, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. नरेंद्र पिवाल, सायबर सेलचे प्रभारी अधिकारी श्री. निलेश वाघ व इतर शाखा/पोस्टे/उपपोस्टे / पोमकेंचे प्रभारी अधिकारी / अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here