Home राजकीय खासदार अशोक नेते यांच्या मागणीला मान देऊन राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मू ०५...

खासदार अशोक नेते यांच्या मागणीला मान देऊन राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मू ०५ जुलै ला येणार गडचिरोली : राष्ट्रपती महामहिम द्रोपदी मुर्मू गडचिरोली ला येणार हे निश्चित

81
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( Gadchiroli )

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शीलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी खासदार अशोक नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा यांनी राष्ट्रपती महामहीम द्रोपदी जी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे गडचिरोली येण्या संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे १० मे २०२३ रोजी भेट घेत मागणी केली होती. त्यावेळी सोबत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे उपस्थित होते.त्याच अनुषंगाने खासदार अशोक नेते यांच्या मागणीनुसार महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रोपदी मुर्मू जी हया ५ जुलै ला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भुमीपुजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला गडचिरोलीत येणार अशी माहिती खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून दिली.स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी, बहुल आकांक्षीत, अविकसित नक्षलग्रस्त प्रभावी, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती येणार हे एक इतिहासातील पहिलीच कदाचित घटना असेल याचे तुम्ही साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आव्हान खासदार अशोक नेते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here