Home अहेरी काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थिती

काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थिती

3
0

अहेरी : साखरपुडा हा मराठी विवाहसंस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा सोहळा असतो .हा केवळ एक पारंपरिक समारंभ नसून नवविवाहित जोडीसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी भावनिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप अर्थपूर्ण असतो.

साखरपुड्याच्या माध्यमातून कुटुंबातील एकात्मता,आनंद आणि विवाहाच्या गोड सुरुवातीचा संदेश दिला जातो.मराठीत “साखरपुडा”या नावाचा अर्थच “साखर” आणि “पुडं” या शब्दांपासून बनलेला आहे.यामध्ये साखरेचे प्रतीक म्हणून गोडवा,प्रेम आणि सामंजस्य यांचा समावेश असतो.

साखरपुडा हा मराठी विवाह संस्कारातील महत्त्वाचा विधी आहे, जो साधारणपणे लग्नाच्या चार-पाच महिने आधी किंवा काही आठवड्यांपूर्वी पार पाडला जातो.याला ‘वाग्दान’असेही म्हणतात.

या विधीत वधू-वराच्या कुटुंबातील सदस्य एकत्र येतात,साखर, फळे व कपडे देवून नात्याला मान्यता देतात, आणि लग्नाची सामाजिक व नैतिक बांधिलकी निश्चित होते.

काल अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील माजी जि.प.सदस्य अजय नैताम यांचे बहीण इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सदस्या रोजाताई नैताम यांची साखरपुडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर साखरपुडा कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून नव्याने सुरु करत असलेल्या वधू – वराला भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here