गडचिरोली : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची गडचिरोली दौऱ्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव अजयभाऊ कंकडालवार यांनी त्यांची रानफुल निवास्थानी भेट घेऊन जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका तसेच जिल्ह्यातील विविध ज्वलंत समस्यांवर चर्चा केली.
काल आमदार वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे आगमना नंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील व जिल्ह्यातील समस्यांवर पत्रकारांशी संवाद साधले. या पत्रकार परिषदेत त्यांनी चामोर्शी व गडचिरोली तालुक्यातील जमीन अधिग्रहण बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली होती.
यानंतर दोन्ही नेत्यांनी शेतकरी शिष्टमंडळाशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.दुपारी त्यांनी स्व. मानकल्लोजी असाटी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.
त्यानंतर ‘जनफुल निवास’ येथे त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक आढावा घेतला.दुपारनंतर गडचिरोलीवरून नागभीडकडे प्रस्थान करून सायंकाळी नागभीड येथे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून,परिसरात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले.या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विविध ठिकाणी नागरिकांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत करत आपल्या समस्या मांडल्या.
रात्री नागपूर येथे परतल्यानंतर दौऱ्याची सांगता झाली. एकूणच, शेतकरी प्रश्न, संघटन बळकटीकरण आणि कार्यकर्त्यांशी संवाद यावर केंद्रित असलेला हा दौरा गडचिरोली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला.
Home गडचिरोली गडचिरोलीत कंकडालवार यांनी घेतली आमदार वडेट्टीवार यांची भेट..दोघांमध्ये झाली स्थानिक स्वराज्य संस्था...



