मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बंदूकपल्ली येथील हनुमान भक्त व ग्रामस्थ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार काल हनुमान जन्मोस्तव दिनाचे शुभ पर्वावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते हनुमान मंदिर बांधकामची भूमिपूजन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.
विशेष म्हणजे बंदूकपल्ली येथे कंकडालवार परिवाराकडून भव्य- दिव्य असं हनुमान मंदिर उभं होणार असून या मंदिर बांधकामाची संपूर्ण खर्च काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार उचलणार आहे.
यापूर्वी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी मुलचेरा तालुका दौऱ्यावर असतांना त्यांना बंदूकपल्ली येथील हनुमान भक्त व ग्रामस्थ्यांनी त्यांची भेट घेऊन गावात स्व:खर्चाने हनुमान मंदिर बांधकाम करून देण्याची विनंती केले होते.
त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी ग्रामस्थ्यांच्या मागणीला मान देऊन गावात स्व:खर्चाने हनुमान मंदिर बांधकाम करून देण्याची आश्वासन दिले होते.
बंदूकपल्ली येथील ग्रामस्थ्यांना व हनुमान भक्तांना दिलेल्या आश्वासनानुसार काल हनुमान जन्मोस्तव शुभ पर्वावर कंकडालवार यांच्या शुभहस्ते हनुमान मंदिर बांधकामाची भूमिपूजन सोहळा पार पडला.
बंदूकपल्ली येथील ग्रामस्थ्यांना व हनुमान भक्तांना दिलेल्या आश्वासनावर ठाम राहून स्व:खर्चाने हनुमान मंदिर बांधकाम करून देणार असल्याने बंदूकपल्ली वासियांनी अजयभाऊ कंकडालवार यांचे मनापासून आभार मानत खूप समाधानी झाले.
हनुमान मंदिर बांधकाम भूमिपूजन सोहळ्याला काँग्रेस नेते हनुमंतू मडावी,प्रमोद गुट्टेवार तालुका अध्यक्ष मुलचेरा,अनुप नंदी उपाध्यक्ष,कालिदास कुसनाके(ता.अध्यक्ष) अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,संदीप तोरे उपाध्यक्ष,केजीकराव आरके,प्रभाकर मडावी,रणजित आलाम,किशोर आत्राम,हिरामण दिवटीवार,तुळशीराम पेंदाम,जमणादास आलाम,चरणदास आत्राम,किशोर करपेत,बंडू सिडाम,देवराव तलांडे,अनिल कुडमेथे,विजय करपेत,राजेश आलाम,संतोष तोरे आनंदराव मडावी यांच्या सह आदी उपस्थित होते.
Home अहेरी बंदूकपल्ली येथे काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार स्व:खर्चाने उभारणार हनुमान मंदिर…डॉ.कंकडालवार यांच्या हस्ते...





