Home अहेरी आलापल्ली महावितरण विभागीय कार्यालयातील रिक्त पदे भरा

आलापल्ली महावितरण विभागीय कार्यालयातील रिक्त पदे भरा

19
0

अहेरी : क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सिरोंचा,अहेरी,भामरागड, एटापल्ली,मुलचेरा या पाच तालुक्यात विद्युत विभागाचा समस्यामुळे नाहकत्रास सहन करावा लागत असल्याने सदर समस्या मार्गी लावून आलापल्ली महावितरण विभागीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी काँग्रेस आदिवासी जिल्हाध्यक्ष हनमंतु गंगाराम मडावी यांनी अधिक्षक अभियंता,महावितरण यांना निवेदनातून केली आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील तालुके भौगोलीक दृष्ट्या जास्त, क्षेत्रफळाने अतिदुर्गम, अतीसंवदेनशील आणि मागासलेल्या असल्यामुळे नेहमी येथील जनतेला विद्युत विभागाचा समस्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असतो.प्रत्येक वेळेस या-त्या कारणामुळे विजेचा लंपडाव सुरुच असते.तसेच सध्यास्थितीत सदर विभाग कार्यकारी अभियंता,उप अभियंता,शाखा अभियंता आणि लाईनमन स्तरावरील बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे येथील जनतेला उन्हाळा असो की पावसाळा असो विज पुरवठा तसेच वाढीव विज बिलाबाबतची समस्या नेहमीच असते.

रिक्त पदामुळे या समस्याचे निराकरण करण्यासाठी कोणीही उपलब्ध राहत नाही.नादुरुस्त टान्सफार्मर,अंदाजीत व मनमानी विद्युत बिले, गाव-खेडेचा विद्युत पुरवठा चार-पाच दिवस बंद असते सततचे विजेचा लंपडाव तसेच अहेरी सारख्या उपजिल्हाच्या ठिकाणी बरेच वर्षापासुन ( AE DY )ची इंजीनीअरची पद रिक्त असल्यामुळे येथील जनतेला विद्युत विभागा विषयी संताप व्यक्त करीत आहे.अशी बिकट व्यवस्था एटापल्ली आणी भामरागड तालुक्याची सुध्दा आहे.तसेच सिरोंचा तालुक्यातील अभियंताची मनमानी कारभारामुळे तेथील जनता आणी शेतकरी त्रस्त आहे.

त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील विजेच्या समस्या निकाली काढून तसेच संबंधीत विभागातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावे.अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही हनमंतु गंगाराम मडावी यांनी निवेदनातून दिला आहे.

यावेळी निवेदन देतांना मा.सरपंच सतीश आत्राम,चंदू भाऊ बेझलवार,रज्जाक भाई पठाण,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here