भामरागड : तालुक्यातील ताडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक व भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे जेष्ठानेते मादीजी केसा आत्राम यांची काल दुखद निधन झाले होते.
या दुःखद निधनाची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून होतच आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी वेळेची विलंब न करता तडगाव येथे जाऊन मदिजी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आत्राम कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी भामरागड नगरपंचायतचे नगरउपाध्यक्ष विष्णू मडावी,मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी,भामरागड काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बालू भोगामी,सुधाकर तिम्मा,राजू वडे,डोलेश आत्राम,राकेश आतलामी,रामा तिम्मा,मधुकर कोवासे,संतू कोवासे,रमेश तिम्मा,शैलू आत्राम,महेंद्र पल्ले तसेच स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.