Home सिरोंचा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

35
0

सिरोंचा : तालुक्यातील टेकडामोटला येथील हनुमान क्रिकेट क्लब टेकडामोटला तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केली आहे.या स्पर्धेचे उदघाटन आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

सदर या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम – काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी यांच्या कडून देण्यात येत आहे. तृतीय पारितोषिक टेकडामोटला ग्रामपंचायतचे उपसरपंच रामचंद्रमल गोगूला यांच्या कडून देण्यात येत आहे.

सर्व प्रथम माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सरस्वती माताची प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केली.यावेळी उपस्थित आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिकसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here