अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील कांताबाई सूर्यभान मराठे यांनी तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे कापूस वेचणीसाठी गेले होते.काल नवीन वर्षच्या निमित्या देवदर्शनसाठी वेमूलवाडा येथे जात असतांना चार चाकी वाहन सिरसिल्ला जवळ अपघात झाले होते.या अपघातात कांताबाई मराठे यांचे जागीच मूत्यू झाला.
विशेष म्हणजे कांताबाई मराठेसह वेलगूर येथील आनंदराव मराठे,गंगुबाई मराठे,कविता पालोजवार,रेखा गाताडे,लक्षमीबाई मंडरे,वनिता सातारे,भिकू सातारे,उषा मराठे,सुनंदा राऊत,माया मराठे,ज्योती मराठे,विमल मराठे,निर्मला मंडरे,सुधाकर गदेकर,सुरेखा गदेकर यांनीही कापूस वेचणीसाठी घेले होते.या सर्वांनी देवदर्शनसाठी जात असतांना हा अपघात झालं.अपघातात कांताबाई जागीच ठर झालं आणि इतर पंधरा जण गंभीर जखमी होऊन करीमनगर दवाखान्यात भर्ती होत उपचार घेत आहे.
या गंभीर विषयांची माहिती गावाकडे नातेवाईकांना माहिती झाले मात्र त्यांना करीमनगर जाण्यासाठी आणि तिकडे उपचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी खूप अडचण भासत होती.त्यावेळी त्या नातेवाईकांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सांगितले होते.कंकडालवारांनी त्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना जाण्यासाठी तसेच दवाखान्यात उपचारा खर्चासाठी आर्थिक मदत केले आहे.
यावेळी मदत करतांना अजय कंकडालवार सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.