आलापल्ली : ३ जानेवारी ही भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे.समाजसुधारक आणि महिलांसाठी काम करण्यासाठी त्या ओळखल्या जातात.
१९व्या शतकात समाजात प्रचलित असलेल्या अत्याचारी समाजव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत.
आज सावित्रीबाई फुले यांचा जयंती असून आलापल्ली येथे वॉर्ड क्रमांक 4 मध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थिताना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी आयोजकांना आपल्या परीने आर्थिक देणगीही देण्यात आली.
सर्व प्रथम अजय कंकडालवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.तसेच कार्यक्रम आयोजकांकडून कंकडालवार यांचे स्वागत करण्यात आली.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायत सरपंच शंकर मेश्राम,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, सचिन पांचार्या,प्रवीण कोरेत, ओमकार जक्कोजवार यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते वॉर्डातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी आलापल्ली येथे सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा…माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची...





