एटापल्ली : तालुक्यातील भापडा ( जारावांडी ) येथील रहिवासी आणि गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दामजी नाईक (४४) यांचे काल २ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हृदविकराच्या झटक्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात निधन झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी – दोन मुली – आई – वडील – एकभाऊ – एक बहिण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता भापडा येथील बांदीया नदिजवळील स्मशानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आले.आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कुटुंबियांना मोठ्या आस्तेने विचारपूस करून सांत्वन केले.
यावेळी काँग्रेसचे नेते व गडचिरोली विधानसभाचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी,गडचिरोली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक हनमंतूजी मडावी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान,जिल्हाअध्यक्ष अनुसूचित जाती सेल काँग्रेस रजनीकांत मोटघरे,उपसरपंच सुधाकर टेकांम,काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश गंपावार,पंस. सदस्य मंगेश हलामि,काँग्रेस नेते आविस तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागुलवार,न.सेवक निजाम पेंदाम,न.सेवक किसन हिचामी,न.सेवक नामदेव हिचामी,लोकेश गावडे,ग्राप सदस्य अंतुभाऊ नरोटे,भामरागड काँग्रेस नेते आविस तालुका अध्यक्ष सुधाकर तीम्मा,काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,दासरवार भाऊ,स्वप्निल कनमवार,सचिन पांचर्या,प्रमोद गोडशेलवारसह जिल्हातील काँग्रेस कार्यकर्ते आविस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अंतिम संस्कार...