Home अहेरी बौध्द बांधवांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्यासाठी आर्थिक मदत

बौध्द बांधवांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्यासाठी आर्थिक मदत

32
0

अहेरी : तालुक्यातील इंदाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोदुमतूर्रा येथील बौध्द बांधवांना भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक उभारण्याचे बौध्द बांधवांनी निर्णय घेतला आहे.आणि लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

आज मोदूमतूर्रा येथील बौध्द बांधवांनी आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालयात भेट दिले असता.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बौध्द बांधवांना भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी तुळशीराम कांबळे, दामोधर वाघाडे,विनोद कांबळे, हरिष तावडे,मोहन दहागावकर,रमेश वाघाडे,गणपत तावाडे ,मनोहर तवाडे,रुपेश,गोवर्धन जीट्टीवार,अमित कांबळे,लोकेश जीट्टीवार,अक्षय वाघाडे,प्रवीण वाघाडे,लक्ष्मण दुर्गे,अनिल दहागावकर,मोदूमतूर्रा येथिल बौध्द उपासक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here