अहेरी : आजचे क्रिडा क्षेत्र हे स्पर्धात्मक असून क्रिडा स्पर्धांमंध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूनी सामना जिंकण्यासाठी जिद्द,चिकाटीसह खिलाडीवृत्ती अंगीकारून जर खेळल्यास स्वतःच्या संघाला नक्कीच विजय संपादन करून देईल,असे प्रतिपादन अजय कंकडालवार यांनी केले.
अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील हंटर्स क्लब नवेगाव द्वारा भव्य खुले व ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली आहे.
व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर,किष्ठापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले,नागोराव सोनुले कडून तृतीय पारितोषिक हरिदास आत्राम,चिंत्तु विश्वास कडून देण्यात येत आहे.
कार्यक्रमचे सहउदघाटक म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर हे होते.कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.त्यावेळी अजय कंकडालवार नवेगाव गावात आगमन होतच गावकर्यांकडून तसेच मंडळ कडून विविध नृत्या करत जंगी स्वागत केले.सर्व प्रथम सावित्रीबाई फुले,जोतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मंचावर स्थानिक प्रतिष्ठित नागरिक तसेच परिसरातील क्रीडा प्रेमी,काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.