अहेरी टुडे न्यूज नेटवर्क / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( Gadchiroli )
गडचिरोली: कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या यामध्ये तालुका अहेरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली (१८)अठरा पैकी बहुमताने अकरा (११) उमेदवार विजयी झाल्याबद्दल गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.अशोक नेते साहेबांनी विश्रामगृह गडचिरोली येथे भेट झाली असता या भेटी दरम्यान त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचाली साठी अभिनंदन केले.यावेळी सोबत प्रदेश सरचिटणीस,भाजपा एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम उपस्थित होते.