Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांला आर्थिक मदत

73
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील शेख कासम शेख अब्बास यांच्या तब्बेत ठीक नसल्याने चंद्रपूर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत,त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत होती. शेख कासम शेख अब्बास यांच्या प्रकृतीची माहिती आल्लापल्ली येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्तेकडून आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली,माहिती होताच त्यांच्या मुलगा इकराम कासम शेख यांना अहेरी जनसंपर्क कार्यालयात बोलवून पुढील औषधं उपचार करिता आर्थिक मदत केले.

यावेळी सलीम शेख, सलाम शेख,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, विनोद रामटेके, रवी भोयर, राकेश सडमेक सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here