अहेरी : तालुक्यातील आरेदा येथील मादीरामा आत्राम काही कामानिमित्य आलापल्ली येथील येऊन आपले कामे आटोपून परत घरी जात असतांना आलपल्ली ते तलवडा खडीकरणाचे कामे चालू असून रस्त्याच्या मेरेला चिखल असल्याने वाहनाचा तोल गेल्यामुळे दुचाकी वाहन खाली कोसळली यात मोदीरामा आत्राम यांच्या पायाला खूप दुखापत झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु एक्सरे पाहिल्यावर डॉक्टराणी त्याचा पाय फ्याक्चर झाल्याचे सांगितले.
काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनकडून माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता कंकडालवार यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते दाखल होऊन त्यांची त्याबेत बाबत विचारपूस करून आत्राम परिवाराला ठाणेगाव येथे उपचाराकरीता आर्थिक मदत केली.
यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून आत्राम कुटुंबियांना मोठा धीर दिला.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,मादीरामा यांची पत्नी,साईनाथ आत्राम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,कुमार गुरनुले,सचिन पंचार्य,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.