एटापल्ली : तालुक्यातील डुम्मे येथील जय बजरंग क्लब डुम्मे क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित केले आहे.सदर आयोजित स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमाचे सह उदघाटक म्हणून एटापल्ली तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार हे होते.कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून गुरुपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच कैलास उसेंडी होते.
त्यावेळी उदघाटन दरम्यान कंकडालवारांनी मार्गदर्शन करतांना म्हंटले की’आजच्या आधुनिक युगात शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाला सुध्दा विशेष महत्व आहे.खेळामुळे युवकांच्या क्रीडा गुणांना चालणा मिळून शारीरिक व मानसिक विकास घडून येतो.ग्रामीण भागातून सुध्दा उत्तम खेळाडू निर्माण झाले पाहीजे.कबड्डी हा सांघीक खेळू असून प्रत्येकांनी संघभावनेने खेळून क्रीडा गुणांचे दर्शन घडवावे असे प्रतिपादन केले.
यावेळी अक्षय पुंनगाटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका अध्यक्ष एटापल्ली,यशवंत दहागावकर शिक्षक,दुलसाजी पुंनगाटी से.नि.psi सुधाकर गोटा रेकणार इलका अध्यक्ष,डोलेश मडावी तोडसा पट्टी अध्यक्ष,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,भीमरावजी देवतळे,सुबाशजी खेडे,दुलसाजी पंगाटी, कैलास उसेंडी,मिरसा लेकामी,पाटाळी पुंगाटी,तेजस गुज्जलवार,मधुकर पुंगाटी,,शोबूजी लेकामी,जोगजी मडावी,अकलेश झोडे, सरीता नरोटी,सपना झोडे,कार्तिक तोगम,तशूभाऊ सह परिसरातील क्रिडा प्रेमी तसेच आविसं,काँग्रेस स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.