अहेरी : आदि आदर्श योजनेंतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायतींना कामांवर ४० टक्के अतिरिक्त निधी दिला जातो.पण दोन वर्षांपासून या निधीचे वाटप रखडले आहे.निधी तातडीने अदा करावा.अशी मागणी माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी केली.
यासंदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना ७ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले.आदि आदर्श योजने अंतर्गत २०२३-२४ च्या कामांना शासनातर्फे ४० टक्के निधी देण्यात आला.परंतु प्रकल्प कार्यालयामार्फत दोन वर्षांपासून पंचायत समिती व ग्रामपंचायतला निधी वितरण करण्यात आला नाही.निधी वाटप न केल्यामुळे मार्च २०२४ ला तो परत गेला.
त्यानंतर या कामांसाठी पुन्हा नव्याने निधीची तरतूद केली.पण प्रकल्प कार्यालयाकडून या निधीचे वितरण करण्यात आले नाही.दोन वर्षांपासून रखडलेला निधी वितरित का करण्यात आले नाही.याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी दोषींवर योग्य ती कारवाई करावी.अशी मागणी अजयभाऊ कंकडालवार यांनी केली.यासंदर्भात मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आले.