चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते,जनतेच्या मनामनात आदराने स्थान मिळवलेले आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पुन्हा एकदा आपल्या माणुसकीच्या व सामाजिक जबाबदारीच्या भावनेचा आदर्श उभा केला.
गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस विभागात SPU (Special Protection Unit) मध्ये कार्यरत असलेले आणि अनेक MLA, MP यांच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून कार्यरत असलेले डोन्नायाजी पेद्दी हे गेल्या चार महिन्यांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असून सध्या बेशुद्ध अवस्थेत चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
या बाबतची माहिती मिळताच मा.श्री.अजय कंकडालवार यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेतला.रुग्णाशी संवाद शक्य नसतानाही त्यांनी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करत उच्च दर्जाचे व तत्पर उपचार सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.डोन्नायाजी यांनी आयुष्यभर पोलीस खात्यात कर्तव्यनिष्ठेने सेवा केली आहे.आज ते आजारी आहेत,तर आपण त्यांच्यासाठी उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे.असे कंकडालवारांनी सांगितले.
अजयभाऊ कंकडालवार — खऱ्या अर्थाने जनतेचे नेता
मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार हे केवळ एक राजकीय नेता नसून,जनतेच्या गरजा,भावना आणि संकटे समजून घेणारे समाजसेवक आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी शिक्षण,आरोग्य,ग्रामीण रस्ते,जलसंधारण,रोजगार निर्मिती आदी विविध क्षेत्रांत ठोस कामगिरी केली आहे.आजही पद नसतानाही जनतेशी असलेला नातेसंबंध आणि मदतीची तत्परता त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा नेता बनवते.
कुटुंबीयांना दिला धीर,हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या कठोर सूचना
रुग्णालयातील भेटीत त्यांनी डोन्नायाजींच्या कुटुंबीयांना धीर देत मानसिक आधार दिला.डॉक्टरांना उपचारांमध्ये कसूर न ठेवता आवश्यक ती वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
स्थानिक नागरिक,पोलीस विभागातील सहकारी व काँग्रेस कार्यकर्ते यांनीही अजयभाऊंच्या या माणुसकीच्या भावनेचे भरभरून कौतुक केले आहे.