Home मुख्य बातम्या आलापल्ली आणि नागेपल्लीवासियांच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरत आहे : माजी...

आलापल्ली आणि नागेपल्लीवासियांच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरत आहे : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार काढणार मोर्चा

92
0

अहेरी : आलापल्ली आणि नागेपल्ली येथील नागरिकांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून बनविण्यात आलेली नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली.पण अद्याप ही योजना सुरू झाली नाही किंवा ग्राम पंचायतकडे हस्तांतरित झाली नाही.त्यावरून या योजनेचे पाणी कुठे मुरत आहे.असा प्रश्न माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आविसचे नेते अजय कंकडालवार यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर घरोघरी पाणी पुरवठा सुरू केला नाही तर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.यासंदर्भात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंग यांना निवेदन सादर केले.

प्राप्त महितीनुसार,पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेले पाईपलाईन हे निकृष्ठ दर्जाचे असल्याने ते पाईपलाईन फुटून गेलेले आहेत.१५ वा वित्त आयोगमधून ही नळजोडणी करण्यात आलेली आहे.परंतु नळ जोडणी करण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून रीतसर काम करण्यात आलेले नाही.त्या जोडणीमध्ये वापरण्यात आलेले साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे वापरण्यात आले आहेत. त्यामुळे जिथे तिथे पाईप फुटून पाणी वाया जात आहे.परिणामी नागरिकांना घराघरापर्यंत पाणी पोहचू शकत नाही.तसेच आलापल्ली येथील पाणीपुरवठा योजनेची पुर्ण कामे झालेली नाही, प्रत्येक घराघरात पाणी पोहोचले नाही.तरीसुद्धा सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामपंचायत मधील कोणत्याही सदस्याला,कमिटीला विश्वासात न घेता, ग्रामसभेत न ठेवता स्वतःच्या मर्जीने काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.नळ जोडणी देताना अनेक ठिकाणी नालीच्या मधोमध व सांडपाण्याच्या मध्ये पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्यात आले.आलापल्ली येथे नळजोडणीचे काम करणाऱ्या कंत्राटदार यांचेमार्फत काम पाहणाऱ्यांनी लाभार्थीवर जास्तीचे पैसे दिल्याशिवाय पाईप जोडणी करून दिली नसल्याचा आरोप काही नागरिकांची केला आहे.घरोघरी पाणी देण्याचे शासनाचे, जिल्हा परिषदचे स्वप्न असतांना सहा महिन्यापासून कामे पूर्ण झाले असताना लोकांना घरोघरी पाणी न मिळणे योग्य नाही.या कामावर देखरेख करणारे उपअभियंता रामटेके अभियंता व वरिष्ठ अधिकारी कोणत्याही कामावर न जाता मोजमाप पत्रिकेत नोंद घेऊन त्यांचे बिल काढण्यात आले आहे.एवढी मोठी योजना पूर्ण होऊनही लोकांना पाणी मिळत नसल्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जे पदाधिकारी किंवा अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी.अशी मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here