Home मुख्य बातम्या नरभक्षक वाघास जेरबंद करण्यास पथक दाखल : जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी...

नरभक्षक वाघास जेरबंद करण्यास पथक दाखल : जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तात्काळ जेरबंद करण्याची केली होती मागणी

58
0

मूलचेरा : तालुक्यात नरभक्षक वाघाचा धुमाकुळ सुरू असून वाघाच्या हल्ल्यात दोन महिला व काही इसम जखमी झाले.याबाबत आविसं काँग्रेसचे युवा नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वाघास तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली असता.मागणी दाखल घेऊन तात्काळ वनविभागाचे पथक दाखल झाले आहे.

तालुक्यातील मथुरानगर व कोडसापूर येथील दोन महिलांवर नरभक्षक वाघाने हल्ला करून ठार केले.त्या नरभक्षक वाघामुळे मूलचेरासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करणे आवश्यक असून वनविभागाने योग्य पाऊल उचलून संध्याकाळ पर्यंत वाघाचा बंदोबस्त करणारे पथक जर पोहचलेले आढळून आले नाही.

तर समस्त शेतकरी व नागरिकांसह १७ जानेवारी रोजी सकाळी DFO कार्यलयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली आहे. वनविभागानेही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन व मागणीला अनुसरून १६ जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत वाघास जेरबंद करण्यास पथक दाखल केले आहे.त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा निस्वास सोडला असून जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले आहे.वनविभाग त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यास त्याच्या मागावर असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here