अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतात.यावर्षी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत अहेरी तालुक्यात सगळीकडे बाप्पाचा प्रतिष्ठापणा मोठा उत्साहात पार पडला.यात विशेष म्हणजे अहेरी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 येथील ढीवार मोहल्यात या वर्षी सुद्धा मोठ्या उत्सहात श्रीगणरायाची प्रतिष्ठापना केले आहे.
काल मंडळाजवळ श्रीगणरायाची महाआरती कार्यक्रम आयोजित केले आहे.महाआरती कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी कार्यकर्त्यांसमवेशत उपस्थित राहून बाप्पाचे विविध पूजा अर्चना करून आरती दिले.तसेच मंडळाला वर्गणी देण्यात आली आहे.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,उमेश बोरेवार,राहुल बाकेवार,प्रशांत पडगेलवार,वेणुगोपाल मंचारलावार, अधर्ष रमगुंडावार,प्रेया मगडीवार,साक्षी बाकेवार,रोज्या बाकेवार,वाचला बोरेवार,दीपा बोरेवार,रवी बोरेवार,अरुण मंचरलावार, प्रेयां गुंमलवार, रोहीत पडगेलवार,राहुल पडगेलवार,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच वॉर्डातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.