Home मुख्य बातम्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या : अजय कंकडालवार

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या : अजय कंकडालवार

41
0

गडचिरोली : तामिळनाडू राज्यातील मिकजॉम वादळाची फटका महाराष्ट्रातल्या दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा,अहेरी,मूलचेरा,भामरागड आणि एटापल्ली या तालुक्यांना बसली असून”या”भागात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊसाची संततधार सुरू असून या अवकाळी पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील शेतकऱ्यांना बसले असून यात अनेक शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली आहे.

राज्य सरकार व संबंधित विभागाने शेतकऱ्यांची पिकांची नुकसानीची तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांनी केली आहे.

अवकाळी पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा,अहेरी,एटापल्ली,भामरागड आणि मूलचेरा या तालुक्यातील शेतकऱ्यांची धान,मिरची,कापूस आदि पिकांची नुकसान झाली असून”या”नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या उभी पिके या अवकाळी पावसामुळे पूर्णत नष्ट झाल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांची झालेल्या नुकसानीची मोका पंचनामे करून राज्य सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आविसं अजयभाऊ मित्रपरिवारचे विदर्भ नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here