Home अहेरी प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे :...

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार

15
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या संड्रा येथील गोल्डन सी.सी.क्रिकेट क्लब संड्रा द्वारे ग्रामीण टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेची उदघाटन काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समीर सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

त्यावेळी उदघाटन करतांना अजयभाऊ मानले की’आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबरच खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचा व क्षेत्राचा नावलौकीक वाढवावा असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

या क्रिकेट स्पर्धेसाठी अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी – नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे – उपसरपंच शानगोंडावार कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक कंत्राटदार विशाल रापेल्लीवार – कंत्राटदार महादेव लंगारी कडून देण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी गावात आगमन होतच विविध नूत्या करत ढोल तशाने फटाकेची अतिशय बाजी करत जंगी स्वागत केली.उदघाटन संपलेवार येथील नागरिकांची संवाद साधात येथील समस्या जाणून घेतले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी होते.सहउदघाटक म्हणून नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे होते.कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच रमेश शानगोंडावार – सामाजिक कार्यकर्ते पोशालू चौधरी – ग्रामपंचायत सदस्य राकेश कुळमेथे – सदस्य मंजुषा गावडे होते.

यावेळी अहेरी काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम,विशाल रापेल्लीवार,लक्ष्मण कोडापे,रमेश शानगोंडावार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,गुलाबराव सोयाम,राकेश कुळमेथे,बि.जी.गावडे सर,पोशालू चौधरी,अशोक गावडे,चिन्ना गावडे,सुदेव पेंदाम,विनोद सडमेक,विनोद येरमा,गणपती गावडे,अंजना पेंदाम,मंजुषा गावडे,बीमनपल्लीवार सर,पास्पूनुरवार वनरक्षक व्येकाटरावपेठा,बंदेला सर,कुमरे वनरक्षक इंदाराम,दोतरे वनरक्षक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळातील पदाधिकारी सदस्यसह गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here