Home मुख्य बातम्या वेलगुर येथील माता मंदिर उभारणार : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांना...

वेलगुर येथील माता मंदिर उभारणार : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांना दिले आश्वासन

52
0

अहेरी : तालुक्यातील वेलगुर येथील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गातील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत होती.प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल.सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरात जावून पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पडत असतात.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी वेलगुर येथील दौऱ्यावर घेले असता.

दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक माता मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारचे अडचण भासत होती हे सांगितले.गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन अजयभाऊ कंकडालवार म्हणाले की”आपल्याला शासना कडून आताचे आता माता मंदिर साठी निधी उपलब्ध होत नाही.मात्र मी माझ्या स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले.त्यावेळी समस्त वेलगुर नागरिकांनी अजयभाऊंची आभार मानले आणि वेलगुर नागरिकांचा चेहऱ्यावर आनंदाचा वातावरण दिसून आले.

यावेळी वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अस्याना दुधी,प्रमोद गोडसेलवार,मनोहर पाटील चालूरकर,रवी गवत्रे,काशिनाथ गद्धेकर,प्रफुल ओंदरे,सुळताबई चाकूरकर,कमलाबाई राऊत,गणपत मडावी,वासुदेव मडावी,सुगांदा दुधी,निशा झाडे,मीनाबई जंगमवार,सुनीता बावणे,मारोती बावणे,संजय बावणे,दिलीप दुर्गेसह परिसरातील आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वेलगुर गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here