अहेरी : तालुक्यातील मोद्दूमडगु येथील काल श्रीश्री काली पूजा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.या काली महापूजा महोत्सवला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून माँ काली मताचे दर्शन घेतली.
तसेच माँ काली महापूजा महोत्सवला कंकडालवार कडून आपल्यापरिने देणगी देण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो ही माँकाली मताची दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,आविसं भामरागड तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,सपना रॉय,साधन मालाकार,मनोद्र बाला,अशोक मंडल,बबलू देबनाथ,अलोक शिल आविसं,काँग्रेस स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समस्त गावकरी महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.