अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी तालुक्यातील वांगेपली गावातून दररोज जडवाहन आल्लापल्ली ते अहेरी या मार्गावरून तेलंगणा व तेलंगणावरून वांगेपली मार्गाने जड़वाहनांची वाहतूकीची वर्दळ होती. या जडवाहनांच्या वाहतुकीमुळे गावातील रस्ते खराब होऊन येथील नागरिकांना व व्यापाऱ्याना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता तसेच जडवाहनांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता बळावली होती.त्यामूळे सदर रस्त्यांवरील जडवाहन तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते, माजी जि.प.अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली आणि बाजार समितीचे उपसभापती रविंद्रबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वांगेपल्ली येथील सरपंच दिलीप मडावी,दिलीप,उपसरपंच राजेश कोतपल्लीवार, सदस्य संजय आत्राम, कल्पना मडावी, प्रियंका तोडसाम, निलेश आलाम, संतोष येरमे, महेश नैताम, बाबुराव नागपुरे, ईश्वर सिडाम व गावातील समस्त गावकऱ्यांनी चक्काजाम करण्याची इशारा देत या मार्गावरून जडवाहनांना ये-जा करण्यास बंदी असल्याचे फलकही लावण्यात आले होते.
राजकिय नेत्यांनी व गावकऱ्यांनी दिलेल्या चक्काजाम आंदोलन करण्याची इशाऱ्याची संबंधितांनी दखल घेत सद्या या मार्गावरून जडवाहनांची वाहतूक बंद आहे.