Home अहेरी आवलमरी येथील भाजप व रा.कॉ.(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात प्रवेश

आवलमरी येथील भाजप व रा.कॉ.(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात प्रवेश

29
0

अहेरी : तालुक्यातील आवलमरी येथील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाचे युवा कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.

सदरहू पक्ष प्रवेश अहेरी येथील कंकडलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला असून पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुपट्टे अन् पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्रात  काँग्रेस पक्षात इतर पक्षांचे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इंनकमिंग सुरू असल्याने याची फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आवलमरी येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे  माजी सरपंच मारोती मडावी,ग्रामपंचायत सदस्य देवाजी आत्राम,बक्कय्या तलांडी, वेंकटी मोंडी,संद्रम लवंन्ना, मुल्ला तलांडी,अरुण तलंडी,आनंदराव तलांडी,पोचम चटारे, रजनीकांत तमाजुलवार,शंकर मडावी,वसंत तोरेम,वेंकटस्वामी तिरून्हारीवर,मल्लय्या दोंतुलवार,धनंजय सूनतकर आदींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.

पक्षप्रवेशा दरम्यान आवलमरीचे ग्रामपंचायत सरपच अक्षय पोरतेट,उपसरपंच चिरंजिव मिरवेलवार,येरमनार येथील उपसरपंच विजय,शैलेश कोंडगोरले,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चल्लावर काका,राजू दुर्गे,ग्रामपंचायत सदस्या वंदना दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here