अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथे सत्संग उपयोजना केंद्र श्रीश्री ठाकूर अनुकुलचंद्र जी वनभोजन उत्सव कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थित दर्शवून कार्यक्रमला मार्गदर्शन केले.
यावेळी आलापल्लीचे माजी सरपंच अज्जू पठाण,डॉ.गोपाल मंडल,नागोराव सोनुले गोपीनाथ सिकदार डॉ.महेंद्र मंडल,निलमणि मंडल ,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,नरेश गरगम,प्रमोद गोडशेलवार,रेशेभाऊ,कोटरगेभाऊ,परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.