अहेरी : तालुक्यातील किष्टापूर ( वेल )येथील युवक अक्षय जगनाथ कुळमेथे यांनी काल घरगुती कामा निमित्त दुचाकी पकडून घरातून बाहेर निघाले होते.कुळमेथे यांची दुचाकी तलवाडा दिशेने जात असतांना त्यांची दुचाकीवरील नियंत्रण सुटून खाली पडल्याने त्या युवकाची जागीच मूत्यू झाल्याची घटना काल घडली.
आज मृतक युवकाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.या दुःखद घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयाला जाऊन मृतक युवकाचे नातेवाईकांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेत मृतक अक्षय कुळमेथे यांच्या परिवाराला आपल्यापरीने आर्थिक मदत केली.
यामदती दरम्यान अहेरी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डाॅ.निसार ( पप्पू ) हकीम,खमनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच सायुलू मडावी,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,किष्टापूरचे पोलीस पाटील महेश अरका,अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,बबलू सडमेक,विनोद मडावी,किशोर मडावी,आनंदराव मडावी,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी ,कार्यकर्ते तसेच मृतकाचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.
Home मुख्य बातम्या दुचाकी अपघातातील मृतक अक्षय कुळमेथे यांच्या कुटुंबाला अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत