Home मुख्य बातम्या टेकडा मोटला गावात नवीन विद्युत ट्रान्सफार्मर लावा अन्यथा ट्रान्सफार्मरला श्रद्धांजली करू :...

टेकडा मोटला गावात नवीन विद्युत ट्रान्सफार्मर लावा अन्यथा ट्रान्सफार्मरला श्रद्धांजली करू : सामाजिक कार्यकर्ते सागर मूलकला यांची इशारा

56
0

सिरोंचा : तालुक्यातील येणारी आसरअल्ली भागातील असलेल्या टेकडा मोटला गावात विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद पडली आहे.विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद झाल्यामुळे टेकडा मोटला गावातील ग्रामस्थांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.पावसाळ्याच्या दिवस सुरु असून गावात विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील पाण्याची समस्या, वृद्ध आणि लहान मुल,मुलींना त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामस्थांनी संबंधित विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांना गावातील विद्युत पुरवठा खंडित असल्याचे माहिती सांगितले असता अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.लवकरात लवकर विद्युत महावितरण अधिकाऱ्यांनी नवीन विद्युत ट्रान्स फार्मर बसवून गावातील विद्युत पुरवठेची समस्या दूर करा,अन्यथा ट्रान्सफार्मरला श्रद्धांजली करू असे इशारा सामाजिक कार्यकर्ते – सागर मूलकला यांनी केली आहे.त्यावेळी टेकडा मोटला,ग्रामपंचायत उपसरपंच रामचंद्र गोगुलासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here