Home मुख्य बातम्या धुळीमुळे परिसरातील हवा प्रदूषित ; व्हॉइस ऑफ मीडियाकडून बेमुदत साखळी उपोषण

धुळीमुळे परिसरातील हवा प्रदूषित ; व्हॉइस ऑफ मीडियाकडून बेमुदत साखळी उपोषण

1
0

एटापल्ली : शहरातील मुख्य वर्दळीचा रस्तातसेचएटापल्ली-देवदा-गडचिरली,हेडरी-गट्टा तसेच एटापल्ली-जारावंडी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ होत असताना अपघातांचा धोका वाढला असून पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात उडणारी प्रचंड धूळ यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे.धुळीमुळे परिसरातील हवा प्रदूषित होत असून?

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना श्वसनविकार, ऑलर्जी आणि डोळ्यांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.व्यापारी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत असून ग्राहकांची ये-जा कमी झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

या ज्वलंत प्रश्नाबाबत वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करत एटापल्ली येथील व्हॉइस ऑफ मीडिया शाखेच्या पत्रकार संघटनेने आमरण उपोषण सुरू केले आहे.

नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले असून या उपोषणामुळे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आंदोलनस्थळी विविध सामाजिक संघटना आणि नागरिक भेट देऊन समर्थन व्यक्त करत आहेत.

दरम्यान या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला.

यावेळी सैनूजी गोटा आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली,प्रज्वल नागूलवार काँग्रेस नेते एटापल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,पुणेश कांदिकुरवार,प्रमोद गोडसेलवार,निखिताई पुंगाठी,सुमित गोटा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here