अहेरी टुडे न्युज नेटवर्क / देसाईगंज तालुका प्रतिनिधी ( Desaiganj )
देसाईगंज संत शिरोमणी गजानन महाराज सभागृह देसाईगंज या ठिकाणी दी 14.5.2023 रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तथा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने सर्वसामान्य जनतेचे हिताकरिता जनजागृती अभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आलं याप्रसंगी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वराज्य फाउंडेशनचे आलापल्ली जिल्हा गडचिरोली चे पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आले. स्वराज्य फाउंडेशन ग्रामीण भागातील शोषित, पीडित, वंचितांच्या समस्यांना घेऊन कार्य करीत असल्याबद्दल स्वराज्य फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या सदस्यांचा तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरजू लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा व उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा ग्रामीण आणि पुर – परिसथितीत लोकांना तात्काळ मदत अशी अनेक सामाजिक कामे स्वराज्य फाउंडेशन माध्यमातून केली जात आहेत. ग्रामीण भागातील जनसामान्य जनतेसाठी स्वराज्य फाउंडेशन देवदूत ठरले आहे.
सामाजिक क्षेत्रात करीत असलेले उल्लेखनिय व महान कार्यात आपणांस पद्मभुषण मा. अण्णा साहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तथा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने अनंत शुभेच्छा सह आपल्या कार्याबद्दल 1 सन्मानपत्र बहाल करण्यात आल कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मुख्य मार्गदर्शक उपजिल्हाधिकारी समाधान शेळगे मुख्य मार्गदर्शक मा. श्री. अशोकजी सब्बन साहेब केंद्रीय भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, राळेगणसिध्दी मुख्य मार्गदर्शक मा. प्राचार्य बालाजी कोपलवार साहेब उपाध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन नमस महाराष्ट्र तथा विश्वस्त नांदेड जिल्हा . प्रमुख उपस्थिती मा. डॉ. शिवनाथजी कुंभारे साहेब राज्य समिती विश्वस्त भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन तथा थोर विचारवंत, गडचिरोलीकार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. देवाजी तोफा साहेब 1 जेष्ठ समाजसेवक (जगविख्यात ) पेसा ग्रामसभा अभ्यासक, लेखामेंढाआणि समस्त देसाईगंज ग्रामस्थ उपस्थिती होती