अहेरी : तालुक्यातील बोरी येथील प्रसिद्ध व्यापारी सुभाष सावकार गोंड्रालवार यांचे सोमवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास हृदय विकारामुळे निधन झाले.निधनाची बातमी कळताच आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी बोरी येथे लगेच धाव
घेऊन सुभाष सावकार गोंड्रालवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिले.
सुभाष सावकार गोंड्रालवार हे सामाजिक,धार्मिक कार्यात नेहमी सक्रीय असायचे स्वभाव प्रेमळ व मनमिळाऊ होते.बोरी व पंचक्रोशीत प्रसिद्ध व लोकप्रिय होते
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. गोंड्रालवार परिवारात दुःख व आघात झाल्याने दुःखात सामील असल्याचे म्हणत माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गोंड्रालवार परिवाराचे
सांत्वन केले.