Home सामाजिक चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

45
0

मूलचेरा : तालुक्यातील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणेशनगर,सुंदरनगर,मथुरानग येथील श्री.श्री.सार्वजनिक बासंती माता पूजा कमिटी द्वारे चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेचे आयोजन करण्यात आले.या बासंती पूजेला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती राहून विधिवत पूजा करून दर्शन घेतले.यावेळी मंडळाकडून काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयसाठी माँ काली माताकडे प्रार्थना केली.दर्शन दरम्यान काँग्रेस नेते कंकडालवार यांनी येथील स्थानिक समस्या जाणून घेतले आहे.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,रवीभाऊ शहा,कमलेश सरकार,समीर अधिकारी,प्रभाश,चल्लावार काका,कार्तिक तोगम,सलीम भैय्या,सचिन पांचार्या,चींट्या पेंदामसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here