Home सिरोंचा खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर आणि रेंगूठा गावांना भेट

खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर आणि रेंगूठा गावांना भेट

13
0

सिरोंचा : नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांनी अलीकडेच सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिगाणूर आणि रेंगूठा या गावांना भेट दिली.या भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पाहणी करून त्यांनी त्वरित विकासाची गती वाढवण्याचे आश्वासन दिले.

सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीशभाऊ जवाजी यांनी खासदाराकडे या भागातील शिक्षण,आरोग्य सेवा,रस्ते व पुलिया बांधकाम,प्रलंबित वनहक्क पट्टेसह आदी समस्यांची मार्गी लावण्यात यावी.तसेच सिंचन आणि एसटी बस सेवाही सुरू करण्याची खासदार साहेबांकडे मागणी केली.

या भागातील नागरिकांमध्ये डॉ.किरसान यांच्या या भेटीमुळे विकासाची नवी उमेद निर्माण झाली आहे.या पूर्वीचे खासदार या भागात कधीच दिसून आले नाहीत.डॉ. किरसान यांनी निवडून आल्यावर अवघ्या काही महिन्यांतच या भागात भेट देऊन विकासाची खात्री दिली आहे.

आदिवासी भागात खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांच्या या भेटीमुळे आनंदाचे वातावरण आहे.नागरिकांना आशा आहे की’डॉ. किरसान यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात लवकरच विकासाचे नवे अध्याय लिहले जातील.

यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी महेंद्र ब्राह्मणवाडे,माजी आमदार पेंटा रामजी तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकाडवार, जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल हनुमंत मडावी, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सिरोंचा सतीश जवाजी, कांग्रेस नेते बानया जनगाम, अहमद अली,रवी सल्लम, बाजार समिती संचालक अकुला मलिकार्जून, मंदा शंकर,अजयभाऊ सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,अब्दुल सलाम,सारय्या सोनारी, युवा कांग्रेस माजिद अलीसह तसेच आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here